आज शुक्रवार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र ब्रम्हपुरी (ता.सावनेर) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राम स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग लाभला.या प्रसंगी गुरुदेवांच्या विचारांचा, सेवा-संस्कारांचा व समाजप्रबोधनाच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा अनुभवता आला.महाराजांच्या शिकवणीनुसार सत्य, सेवा व समतेच्या मार्गावर चालण्याची नवी ऊर्जा या महोत्सवातून प्राप्त झाली.