संग्रामपूर: वान धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी सतर्क राहण्याचे पुर नियंत्रण कक्षाचे आवाहन
सातपुडा पर्वत रांगा आणि वान धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने वान धरण ९९ टक्के भरले होते. त्यामुळे एक दिवसाआड पाण्याचा विसर्ग होत असल्याने वान नदीला पूर आलेला आहे. गेल्या तीन दिवसापासून सततचा पाऊस सुरु असल्याने वान नदीला पूर आल्याने काटेल, कोलद, रिंगणवाडी-मोमीनाबाद, वानखेड, पातुर्डा गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पूर येवून पूलावरुन पाणी वाहत असल्याने नागरिकांना व नदीकाठावरील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आवाहन वान नदी पुर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.