सातारा: जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त साताऱ्यात जनजागृती रॅली
Satara, Satara | Dec 1, 2025 एच. आय. व्ही संसर्गिताना सन्मानाची वागणूक देणे ही प्रत्येक समाजातील घटकांची जबाबदारी असून त्यांच्यासोबत भेदभाव होऊ नये याकरिता एच. आय. व्ही / एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ अस्तित्वात आला आहे. एच.आय. व्ही संसर्गितांच्या संबंधित तक्रारी व खटले लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश्च तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, सातारा न्या. निना बेदरकर यांनी केले.