धुळे: शाहू नाट्य मंदिरात धुळे पालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर; ७४ पैकी ३७ जागा महिलांच्या नावावर!
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात पार पडली असून, महिलांनी बाजी मारली आहे. ७४ पैकी ३७ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. अनुसूचित जाती-जमातीसाठी प्रत्येकी ३, मागास प्रवर्गासाठी १० आणि सर्वसाधारण गटातील २१ जागा महिलांना मिळाल्या. या सोडतीमुळे अनेकांची राजकीय समीकरणं बदलली असून, हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.