रामटेक: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न.प.बालोद्यान रामटेक येथे तुकडोजी महाराजांचा 57 वा स्मृतिदिन उत्सव साजरा
Ramtek, Nagpur | Oct 20, 2025 सोमवार दिनांक 20 ऑक्टोबरला सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजता पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न. प. बालोद्यान रामटेक येथील प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा स्मृतिदिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता तीर्थ स्थापना करण्यात आली. यानंतर सामूहिक ध्यान, ग्रामगीता वाचन, सामुदायिक प्रार्थना, भजनी मेळावा आयोजित करण्यात आला.