चंद्रपूर: गडचांदूरमध्ये उमेदवाराला मारहाण
कोरपना : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रभाग क्रमांक ९ मध्ये दोन गटात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वसाधारण गटातील उमेदवार समीर पाशा शेख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार माता मंदिराजवळ शुक्रवारी रात्री अंदाजे ११ वाजता घडल्याचे समजते.