पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 साठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित विमा सुविधा उपलब्ध आहे.