शिरपूर: शिरपूर तहसील कार्यालयामार्फत मेन बिल्डिंगमध्ये सेवा पंधरवाड्याचा उत्साहात शुभारंभ
Shirpur, Dhule | Sep 17, 2025 शिरपूर तहसील कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.हा कार्यक्रम 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आ.अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी आ.काशीराम पावरा, उपजिल्हाधिकारी बोरकर,प्रांताधिकारी डॉ.शरद मंडलिक,तहसीलदार महेंद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबविला जाणार आहे