यवतमाळ: खाणगाव येथे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल
11 नोव्हेंबरला फिर्यादी विजय गणपतराव सुरोसे हे त्यांच्या स्टॉप सह खानगाव येथे मोजणी करत असताना आरोपी सुरज बैठवार व आणखी दोन अशा तिघांनी फिर्यादीस तुम्ही आमचे अतिक्रमण का काढत आहे असे म्हणून शिवीगाळ केली तसेच अतिक्रमण बंदोबस्त मधील पोलिसांसोबत झोंबाझोंबी करून जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केला.या प्रकरणी 11 नोव्हेंबरला यवतमाळ ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.