परतूर: वनविभागाने परतवाडी ते आष्टी रोडवर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहणास पकडले
Partur, Jalna | Sep 26, 2025 वनविभागाने लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहणास पकडले 26 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीवरून परतूर तालुक्यातील परतवाडी ते आष्टी रोडवर वन विभागाने चिंच प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करणारे टाटा कंपनीचे वाहन जप्त केले. गोल जळतन लाकूड भरून हे वाहन वाहतूक करत होते. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक. मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी व दौंड आणि वनपरिमंडळ अधिकारी पठाण यांच्या नेतृत्वाखाली झाली. जप्त केलेले वाहन व लाकूड वनविभागाच्या ताब्यात असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.