संगमनेर: चंदनापुरी घाटात एसटी बस पलटी
चारचाकी वाहनाने दिली हुल: ११ प्रवासी किरकोळ जखमी
चंदनापुरी घाटात एसटी बस पलटी चारचाकी वाहनाने दिली हुल: ११ प्रवासी किरकोळ जखमी चारचाकी वाहनानेएसटी बसला हुलकावणी दिल्याने बस साईड गटरात उलटून अपघात झाला. यात बसमधील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज दुपारी नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात नाशिक-पुणे लेनवर घडला. संगमनेर आगाराची संगमनेर-साकूर (एम.एच.०७, सी. ९२५२) ही बस चंदनापुरी घाटात आली असता चारचाकी वाहनाने बसला हुलकावणी दिली आणि ते वाहन भरधाव निघून गेले.