कन्नड: कर दिला तरी सेवा नाही; मग कर कशासाठी? कन्नडपासून सुरू होणार “करमुक्त राजकारण”चा नवा मॉडल! - हर्षवर्धन जाधव
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नडमध्ये “करमुक्त शहर” संकल्पना राबवण्याची घोषणा आज दि ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता केली आहे.त्यांनी सांगितले की, नागरिक कर भरतात पण त्यांना सेवा मिळत नाहीत.म्हणून नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जमिनी भाडे तत्वावर देणार आहेत.या माध्यमातून कन्नडला करमुक्त करून नवे राजकारण सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.“कर भरुन सेवा नाही, मग कर कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.