रिसोड: आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखली बैठक संपन्न
Risod, Washim | Nov 1, 2025 आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 01 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय रिसोड येथे बैठक संपन्न झाली. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपजिल्हाधिकारी महसूल राजेंद्र जाधव अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोये,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर नायब तहसीलदार निवडणूक जवादे, उपस्थित होते.