मूल: मुल रेल्वेजवळील नाल्यात फसलेल्या मैस चे तरुणांनी वाचविले प्राण
गावाजवळील रेल्वे लाईनच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात एक मैस फसली होती. रेल्वेची वाहतूक सुरू असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक होती. मैस तडफडत होती आणि तिचा जीव धोक्यात आला होता. हे पाहताच प्रशांत कोहळे, विशाल नागुलवार, हर्षल गांडलेवार,पियुष गांडलेवार, नितीन कुमरे यांनी तत्काळ धाव घेऊन मदत करण्याचा निर्णय घेतला.