पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसाने कहर... कारेगाव पूल तुटल्याने मोहटा गडावर जाणाऱ्या भाविकांना अडथळा...!
पाथर्डी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं संपूर्ण तालुका हादरून गेलाय.पहाटेपर्यंत कोसळलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद पडले असून, नदीनाल्यांना अचानक पूर आल्याने वाहतुकीची कोडी निर्माण झाली आहे.गावोगावी पाण्याचा महापूर आल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरले आहे.तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने सकाळपासून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडणेही कठीण बनले असून प्रशासनाने तातडीने सावधगि