नांदुरा: जीवाची पर्वा न करता नदीच्या पुरातून वाट काढत आरोग्य पथकाने गाव गाठून दिली आरोग्य सेवा;व्हिडीओ झाला व्हायरल
दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच पडलेल्या मुसळधार पावसामुळे ज्ञानगंगा नदीला पूर येऊन या गावाचा संपर्क तुटला होता,याचवेळी गावात अनेक लोक आजारी पडलेले होते. या लोकांना आरोग्य सेवा देण्याकरिता नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे साथरोग पथक जीवाची परवा न करता ज्ञानगंगा नदी वरील पुलावरून वाहत असलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढत अवध बुद्रुक हे गाव गाठले व येथील रुग्णांना आरोग्य सेवा दिली