हिंगणघाट शहरात वाढत असलेल्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी शहरात भव्य हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगणघाट पोलीस स्टेशन व एन एच आय टी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्यावतीने मोटर वाहन निरीक्षक मेघल आनासाने, सहायक मोटर वाहन निरीक्षक श्री श्रीकांत येवले, आदी उपस्थित होते.