दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आमदार विजय रंहागडाले यांनी भाजपच्या नगरपंचायत उमेदवारांच्या निवडणुकीला घेऊन आढावा घेतला. यावेळी आमदार रंहागडाले यांनी गोरेगाव नगरपंचायत येथे निवडणुकीत उभे असलेल्या सर्व उमेदवारांशी चर्चा केली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रंहागडाले, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, संजय बारेवार,छन्नीलाल अगडे, भाजपा तालुकाध्यक्ष अनंत ठाकरे, भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कोठेवार, स्मित सांगोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.