माळशिरस: माजी आमदार राम सातपुते यांच्यावर के के पाटील यांनी बिनबुडाचे आरोप केले : भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळनवर
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर भाजप नेते के के पाटील यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळनवर यांनी दिली आहे. आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, त्यांनी पुरावे द्यावेत त्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांच्यावर आरोप करावेत, असे आवाहन हळणवर यांनी केले.