अकोट: नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग निहाय मतदानाची टक्केवारी झाली घोषित;अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह
Akot, Akola | Dec 3, 2025 नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले दरम्यान शहरातील एकूण 17 प्रभागातील 90 मतदान केंद्रावर थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले दरम्यान शहरातील विविध प्रभागातील मतदान केंद्रांवरील मतदानाची टक्केवारी घोषित झाल्याने कुठल्या प्रभागांमध्ये किती उत्साह होता हे पुढे आले आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह असल्याने सकाळपासून रांगा होत्या या प्रभागांमध्ये मतदानाची टक्केवारी देखील मोठी आहे तर काही प्रभागात मात्र मत टक्केवारीची घसरगुंडी झालेली दिसली.