जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना रेसीडन्सी व एस.टी. वसाहत परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांचा पर्दाफाश करत चंदनझिरा पोलिसांनी मध्यप्रदेशातील तीन अट्टल गुन्हेगारांना अटक केली. शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी सांयकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपींना 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.