अंबरनाथ: बदलापूर येथील कात्रप परिसरातील वखारीवर पडले भले मोठे झाड
आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बदलापूर येथील कात्रप परिसरातील वखारीवर भले मोठे झाड पडल्याची घटना घडली आहे. हे झाड विद्युत तारांवर पडल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून पडलेले झाड हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी देखील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत आहेत.