माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी महायलगार मोर्चा काढण्यात आला. या महायलगार मोर्चामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित झाले.यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 31 ऑक्टोबरला भारत बंद व रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांच्या वतीने देण्यात आला आहे.तसेच मागण्या मान्य झाल्याशिवाय हार मानणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.