काल एका बिबट्याने भाईंदर येथील एका मानवी वस्तीत शिरकाव केला होता. भाईंदर येथील परिजात सोसायटीमध्ये बिबट्याने शिरकाव केला होता. तसेच बिबट्याने तीन जणांवर हल्ला देखील केला होता. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण होतं. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले. मात्र आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास वनमंत्री गणेश नाईक जखमींची विचारपूस करण्यासाठी भाईंदर येथील टेंभा रुग्णालयात दाखल झाले आहेत.