संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू बेलापूर (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावांतर्गत मल्हार वाडीतील भिसे वस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेर तालुक्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 21 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव पप्पू बाळू दुधवडे (वय 22, रा. ब्राह्मण धरा मसवंडी, ता. संगमनेर) असे असून तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.