बिलोली: बिजुर शेत शिवार येथे तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 8 जुगारी पोलीसांना मिळुन आले, रामतिर्थ पोलीसात गुन्हा दाखल
Biloli, Nanded | Nov 22, 2025 मौजे बिजुर शेत शिवार येथे दि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पाचच्या सुमारास यातील आरोपी १) दिलीप देशमुख व इतर सात आरोपी विनापरवाना बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना नगदी ७ हजार ८०० रूपये व जुगाराचे साहित्यासह पोलिसांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादी पोलिस काॅन्स्टेबल बेळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जांबळीकर आज करीत आहेत.