जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून ई-पॉस (e-POS) मशीनद्वारे धान्य वाटप केले जात असले, तरी तांत्रिक बिघाडाचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही, ज्यामुळे दुकानदार आणि कार्डधारकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला 'टू-जी' सिमकार्डच्या संथ गतीमुळे दुकानदारांना पदरमोड करून वाय-फाय सुविधा घ्यावी लागली होती, तर आता शासनाने जुन्या 'एल-०' स्कॅनरऐवजी पाठवलेले नवीन 'एल-१' स्कॅनर डोकेदुखी ठरत आहे.