जीएमसी नागपूर येथील डॉक्टरांनी मोहन गार्डन येथे एक शोकाकुल कॅण्डल मार्च आयोजित केला. फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली व या कॅन्डल मार्च दरम्यान त्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर संपदा यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर इंटर्न आणि प्राध्यापक सहभागी झाले होते.