वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी कोरोना सारख्या महामारीत रात्रंदिवस काम केले आहे. 8 ते 10 वर्ष काम करून देखील दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले. त्यामुळे यंदाची दिवाळी कंत्राटदारांची अंधारात गेली आहे. आम्हाला न्याय द्यावा, असे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना विज कर्मचारी कंत्राटदारांनी दिल्याची माहिती दि. 11 नोव्हेंबर रोजी देण्यात आली.