धर्माबाद: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मतदान करा - भाजपा नेते तथा मुख्यमंत्री ना.फडणवीस यांचे आवाहन
धर्माबाद नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आपल्या भेट घेण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही मात्र धर्माबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. सुनीता रमेश गौड यांच्यासह नगर सेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी भाजपच्या कमळ ह्या निशाणीवर मतदान द्यावे असे आवाहन भाजपा नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीचा आधार घेत आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास केले आहेत.