मालेगाव महानगरपालिकेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर इस्लाम पार्टीचे 12 उमेदवार हे आघाडीवर असल्याचे समजतात इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा आघाडीवर असल्याची माहिती समोर येत होती