निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चपराड पहाडी परिसरात सध्या अस्वलांच्या मुक्त संचारामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन महाकाय अस्वलांनी मंदिर परिसरात चक्क 'नाईट सफारी' केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, हा सर्व थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चपराड पहाडीवर श्री क्षेत्र दुर्गा मातेचे जागृत देवस्थान असल्याने येथे दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असते, तसेच पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने युवक व्यायामासाठी या पर