चंद्रपूर: मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत या महत्वकांक्षी अभियानाचा मोरवा ग्रामपंचायतीतून पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत या महत्वकांक्षी अभियानाचा आज मौजे मोरवा ग्रामपंचायतीतून चंद्रपूर जिल्ह्यात शुभारंभ केला. राज्याचे लोकाभिमुख मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आला आहे.