गडचिरोली: मुरमाडी गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची न भेटलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा - डॉ नरोटे
मौजा मुरमाडी गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा लाभार्थ्यांना आत्ता पर्यंत फक्त एक- दोन हप्तेच मिळाले आहेत. काही लाभार्थ्यांनी बचत गटातून पैसे उचलले, कर्ज घेऊन घर बांधले आणि ते घर पूर्णत्वास आले.त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेची उर्वरित रक्कम लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशी मागणी डॉ. मिलिंद रामजी नरोटे, उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे निवेदनातून केली