साकोली: भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोडी रोड,सिव्हिल वार्ड,इतर परिसरात करण्यातआली स्वच्छता
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साकोली सेंदूरवाफा भाजपा शहर मंडळाच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत बुधवार दिनांक 17 सप्टेंबरला दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळामध्ये एकोडी रोड, सिव्हिल वार्ड, प्रभाग क्रमांक 8,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व इतर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते