अकोट: नगरपालिका निवडणूक मतमोजणीमुळे अकोट पोपटखेड मार्ग राहणार बंद; जुना बोर्डी मार्गे वाहतुक वळवणार प्रशासनाचा आदेश
Akot, Akola | Dec 1, 2025 अकोट नगरपालिका निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया ही अकोट पोपटखेड रोड मार्गावरील आयटीआय जवळील ट्रायसेम ट्रेनिंग हॉल येथे पार पडणार आहे दरम्यान दोन डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या या मतमोजणी प्रक्रियेमुळे बुधवार रोजी अकोट पोपटखेड रोड मार्ग हा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे तर अकोट पोपटखेड रोड मार्गावरील वाहतूक ही ग्रामीण रुग्णालयातील जुना बोर्डी मार्गे वाहतूक वळवण्यात येणार असल्याचा आदेश प्रशासनाद्वारा दिनांक एक डिसेंबर रोजी बजावण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.