गोंदिया नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने खासदार प्रफुल पटेल यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात सुभाष शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या रॅलीचे प्रशासकीय इमारती जवळ समारोप करून नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे तसेच अधिकृत नगरसेवक उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यासाठी काढण्यात आलेली ही रॅली गोंदिया शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रचंड उत्साहात काढण्यात आली.