खेड: तालुक्यातील भरणे पुलावर ट्रकचा अपघात केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
Khed, Ratnagiri | Apr 22, 2024 खेड तालुक्यातील भरणे नाका पुलावर रस्त्याचा अंदाज न घेता ट्रक डिव्हायडरला आदळून अपघात केल्याप्रकरणी बेळगाव येथील महांतीश लिंगाप्पा तोरणगट्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवारी २० रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.