समुद्रपूर: धोंडगाव येथील श्रीकृष्ण जिनिंग ॲन्ड प्रसिंग मध्ये कापसाला ७ हजार १२१ रुपये भाव देऊन खरेदीची शुभारंभ:१ हजार क्विंटलची आवक
समुद्रपूर :कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या धोंडगाव येथील श्रीकृष्ण जिनिंग ॲन्ड प्रसिंग मध्ये कापूस खरीदी शुभारंभ सभापती हिम्मत चतुर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी कापसाला 7121 रुपये भाव देण्यात आले.काटा पूजन संचालक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर यांनी केले यावेळी ४० वाहनातून अंदाजे एक हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. शेतकरी धनराज भुरे, यांचा सत्कार शाल व श्रीफळ बाजार समिती तर्फे संचालक शांतीलाल गांधी यांनी केले. तर मंगेश खाटीक, यांच्या सत्कार करण्यात आला