रत्नागिरी: करबुडे बोगद्यामध्ये सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह; धावत्या रेल्वेतून पडल्याची शक्यता
करबुडे बोगद्यामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला. ही घटना मंगळवार 9 सप्टेंबर रोजी पहाटे 3.18 वा.सुमारास उघडकीस आली. याबाबत रत्नागिरी लोहमार्ग रेल्वेचे पोलिस हवालदार पांडूरंग वरुटे यांनी खबर दिली आहे. त्यानुसार,भोके रेल्वेस्टेशन येथील स्टेशन मास्तर यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील ठाणे अंमलदारांना फोनव्दारे उक्षी रेल्वे स्टेशन ते भोके रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या करबुडे बोगद्यामध्ये एक तरुण गंभिर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली