बुलढाणा: धाड येथे भव्य जनसंवाद बैठक व आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
धाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज 31 ऑक्टोबर रोजी भव्य जनसंवाद बैठक बुलढाणा आ.संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीत परिसरातील नागरिक, शिवसैनिक,तसेच युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.धाड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे,असा विश्वास आ.गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.