धुळे: शेलबारी ग्रामपंचायत इमारत बांधकामात गैरव्यवहाराचा आरोप; सरपंच-ग्रामसेवकांविरोधात सदस्यांनी जि.प. प्रशासनाला दिले निवेदन
Dhule, Dhule | Nov 8, 2025 साक्री तालुक्यातील शेलबारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामात सरपंच आणि ग्रामसेवकांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. त्यांनी ठराव न करता मनमानीने जागा निश्चित केली असून, ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. खोटी संमती दाखवून अधिकारी दिशाभूल केल्याचा व निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.