महाड: पनवेल महापालिकेची हवा प्रदूषणाविरुद्ध मोठी कारवाई; १६९ बांधकामांना नोटीस
Mahad, Raigad | Dec 1, 2025 पनवेल – वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली असून १६९ बांधकामांना नियमभंगाबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा व पनवेल या प्रभागांमध्ये भरारी पथकांकडून तपासणी करण्यात आली. धूळ नियंत्रणासाठी चार फॉग कॅनन वाहनांद्वारे दररोज ५० किमी परिसरात पाणी फवारणी केली जात आहे. सर्व वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली बसविण्यात आली