मोहाडी तालुक्यातील बोरी येथे आज दि. 28 डिसेंबर रोज रविवारला सकाळी 9 वाजता भंडारा जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ करून देत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.