गोरेगाव: ग्रामपंचायत गणखैरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसभेचे आयोजन
ग्रामपंचायत गणखैरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी शुभारंभ प्रचार प्रसिद्धी व प्रक्षेपण करण्यसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.या विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी त्याची रूपरेखा त्याचे मुख्य घटक हे सविस्तरपणे ग्रामस्थांना सांगण्यात आले.गावाला सुजलाम,सुफलाम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी शासनातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला.त्याविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.