रामटेक: तहसील कार्यालय रामटेक परिसरात मागील चार दिवसांपासून 34 वर्षीय आदिवासी शेतमजुराचे उपोषण सुरूच
Ramtek, Nagpur | Oct 12, 2025 लोधा शिवारातील शेत सर्वे नं. 263 वरील शासकीय कृषी जमिनीवर 1994 पासून शेत वाहीजुपी करीत परिवाराचे पालनपोषण करीत आहे. काही वर्षापासून काही लोक अतिक्रमण करीत आहेत. 30 वर्षापासून वाहीजुपी करताना वन हक्काचा दावा केला असता त्यावर निर्णय घेण्यास विलंब करीत आहे तो दावा कायम करून मला न्याय द्यावा या मागणीसाठी मागील 9 ऑक्टो. पासून तहसील कार्यालय रामटेक परिसरात पत्नी, लहान मुलगा व मुलीसह उपोषणावर बसलेल्या 34 वर्षीय आदिवासी गोविंद उईके याचे उपोषण रविवार दि.12 ऑक्टो.ला रात्री 10 वा सुरुच आहे.