महागाव तालुक्यातील शेनद जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. शेनद जंगल परिसरात चरण्यासाठी गेलेल्या एका गाईवर वाघाने अचानक हल्ला करून तिला ठार केल्याची घटना आज गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने एका बैलावर हल्ला करून त्याला ठार केले होते.