सेलू: हिंगणी येथील 28 वर्षीय युवक बेपत्ता; सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 19, 2025 तालुक्यातील हिंगणी येथे एक युवक घरून बाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. 18 ऑक्टोबरला दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास घडली. सागर गुलाब वरखडे (वय 28, रा. हिंगणी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सागरची आई रेखाबाई गुलाब वरखडे यांनी आज (रविवार, दि. 19 ऑक्टोबर) दुपारी 4.30 वाजता सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.