संग्रामपूर: त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यासाठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांना टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली. सदर घटनेचा अ. भा. मराठी पत्रकार परिषद संलग्नीत संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून सदर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु टोल वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करावा.