सेलू: सेलू पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण जाहीर; ६ गण महिलांसाठी राखीव, ३ वर्षाच्या चिमुकल्याने काढली ईश्वरचिठ्ठी
Seloo, Wardha | Oct 13, 2025 सेलू पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी १२ गणांच्या आरक्षणाची सोडत आज, सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली. या सोडतीचा शुभारंभ ३ वर्षांच्या वेद तांदुळकर या चिमुकल्याच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढून करण्यात आला. यामध्ये एकूण १२ गणांपैकी ६ गण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.